चोरटयांनी फोडले तलाठयाचे घर : रोख रकमेसह सोने लांबवीले

0

लोकशाही न्युज नेटवर्क –

घरफोडीचे सत्र सुरूच असून अशातच जळगाव शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली अशोकनगरमध्ये एका घराचा भरदिवसा कडी-कोयंडा तोडून रोख ५० हजार रुपये व पाच तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनी पाहणी करून तपासणी केली.शिरसोली प्र. न. भागातील रहिवाशी आकाश विजय काळे हे कानळदा येथे तलाठी म्हणून काम पाहतात. ते सकाळीच कानळद्याला गेले होते, तर आई देवदर्शनाला गेली होती. दुपारी एक ते दीड वाजता काळे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून रोख पन्नास हजार रुपये व पाच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. जेवणाचा डबा (मेस) पुरवणाऱ्या बाईंनी घराचा दरवाजा उघडा असल्याचे आकाश काळे यांना फोनवर कळवले, तेव्हा चोरीची घटना समोर आली.
काळे यांनी घर गाठून पाहणी केली असता, घरातील कपाटातील रोख पन्नास हजार रुपये व पाच तोळे सोन्याची चोरी झाल्याचे दिसून आले त्यांनी गावचे पोलिस श्रीकृष्ण बारी यांना चोरीची घटना सांगून औद्योगिक पोलिस ठाण्याला चोरीची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औद्योगिक पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किरण पाटील, नाना तायडे यांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळ गाठले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला.

दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास तीन जण तोंडाला रुमाल बांधून आकाश काळे यांच्या घरात व घराबाहेर उभे असल्याचे समोर राहणाऱ्या लोखंडे नावाच्या महिलेला दिसून आले, परंतु ते आकाशचे मित्र असावेत, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि चोरट्यांनी संधी साधली.

Leave A Reply

Your email address will not be published.