.. माझ्या मुलाने काहीच नाही करायचे का ? उद्धव ठाकरे आक्रमक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.आज शिवसेनेने भवनमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत जोर बैठकांचे आयोजन केलं आहे.

या बैठकीत ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘शिंदे तुम्हाला ते वापरतील आणि फेकून देतील. त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले. पण स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना केला.

शिवसेनेत उभी फूट पडल्याने पक्षात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत अंतर्गत संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे तीसहून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने सेनेवर मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून आज त्यांनी दृक्श्राव्य माध्यमातून पक्ष पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

‘मला या सगळ्यांचा वीट आला आला आहे. आता हीच वीट डोक्यात घालावी लागेल. बाळासाहेब दैवतच आहेत. त्यांनी आदित्य ठाकरेंवर पण आरोप केले. मात्र, स्वतःचा पोरगा खासदार आहे त्याचं काय ? पण माझा पोरगा होता कामा नये. त्याच त्याच गोष्टी बोलत आहेत. सोडून गेलेल्यांनी माझं नाव न वापरता जगून दाखवावं’, असं म्हणत त्यांना एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

‘तुम्हाला अजिबात ब्लॅकमेल करत नाही. माझ्या प्रेमात अडकू नका, माझ्या मोहात प्रेमात अडकू नका. मी लायक नसेल तर सांगा…जसा मी बाळासाहेबांचा पुत्र आहे. तर त्यांचा लाडका अपत्य शिवसेना आहे. केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करून निर्णय घ्या, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही मार्गदर्शन केले. ‘कोणत्या पक्षात आधी विलीन होणार आहात ते ठरवा, मग बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार हे बोला’, असे नीलम गोऱ्हे या एकनाथ शिंदे यांना उद्देशून पदाधिकाऱ्यांना बैठकीत संबोधताना म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.