शिवसेनेचे 2 आमदार फुटणार ! संदीपान भुमरेंचा मोठा दावा

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. दरम्यान शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी खळबळजनक दावा केलाय. शिवसेनेमधील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडील आणखी दोन आमदार फुटणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

शिवसेनेतील आता कोणते आमदार फुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. एका कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं त्यांच्यावर निशाणा साधला जात होता. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भुमरेंनी शिवसेना आणखी फुटणार असल्याचे संकेत दिलेत.

उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन आमदार शिंदे गटात येणार असल्याचं म्हटलंय. कारखान्याचा स्लिप बॉय असलेल्या भुमरेला आम्ही मंत्री केलं, असं उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात असलेल्या नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात होतं. त्यावरुन संदीपान भुमरे यांनी टोला लगावत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या आमदारांबाबत सूचक विधान केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.