कुतुबमीनारपेक्षा उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त.. पहा व्हिडीओ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशमधील नोएडा (Noida) येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अवघ्या 12 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली.

जमीनदोस्त झालेली देशातील ही पहिली उंच इमारत होती. कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत तीन हजार 700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती.  खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टानं ट्विन टॉवर म्हणजे अॅपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांपासून एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर आहेत. त्याचबरोबर वायू प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध असून त्यातून पाण्याची फवारणी केली जात आहे. अँटी स्मॉग गनही बसवण्यात आल्या आहेत. नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर वाहनांची वाहतूक बंद आहे. तीनच्या सुमारास ते उघडले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.