Saturday, January 28, 2023

मालवाहू रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक, तरुणाचा मृत्यू

- Advertisement -

 धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सकाळी १० वाजेच्या सुमारास चोपडा रोडवरील कमल जिनिंगजवळ अज्ञात वाहनाने मालवाहू रिक्षाला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. भावडू उर्फ आशिष गजानन भावसार (वय ३२, रा. धरणगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आशिष भावसार हा तरुण ग्रामीण भागात किरकोळ धान्य विक्रीचा व्यवसाय करत होता. तो परिसरातील ग्रामीण भागात धान्यविक्रीसाठी निघाला होता. चोपडा रोडवरील कमल जिनिंग जवळ अचानकपणे त्याची मालवाहू रिक्षा  बंद पडली. याचवेळी वेळी मागून भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने आशिषच्या मालवाहू रिक्षेला जोरदार धडक दिली.

- Advertisement -

या अपघातात आशिष गंभीर जखमी झाल्याने जळगावला उपचारासाठी नेतांना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे