Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»राजकीय भूकंप : संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; आ. नितेश राणे यांचा दावा
    ताज्या बातम्या

    राजकीय भूकंप : संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार ; आ. नितेश राणे यांचा दावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

    संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे.

    राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. आता नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

    संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार हे नक्की त्यांच्या त्याबाबत बैठकाही सुरु आहेत. माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी संजय राऊतची भूमिका पाहिली असता हे लक्षात येते. अजित पवारांनी पक्ष सोडल्यास मी लगेच पक्ष प्रवेश करतो ही राऊतांची भूमिका आहे. त्यामुळे राऊत सातत्याने अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहे.

    मला राष्ट्रवादीत घ्या

    नीतेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होईल. संजय राऊतने राष्ट्रवादीत असे कळवले आहे की सांगितले, आता उद्धव ठाकरेंकडे पक्ष नाही, त्यांचे काही खरे नाही, ते मला पुन्हा खासदार करु शकत नाही. मला राष्ट्रवादीत घ्या. उद्धव ठाकरेंबरोबर राहण्यात रस नाही.

    नीतेश राणे म्हणाले, पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे 4 वाजता संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.

    नीतेश राणे म्हणाले, शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा देशभरातल्या नेत्यांनी त्यांना फोन केले. मात्र उद्धव ठाकरेंनी पवारांना फोन केला नाही. यापाठिमागे संजय राऊत आहेत जे ठाकरे-पवार भेट होऊ देत नाही. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्यासाठी राऊत हे षडयंत्र करत आहे. राऊत स्वतः चारचार वेळा जाऊन त्यांना भेटले .

    #bjp #ncp Nitesh Rane Sanjay Raut
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.