‘द केरळ स्टोरी’ ने चक्क २ दिवसात कमविले ‘इतके’ कोटी !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट रुलीज होण्याआधी वधाच्या भोवऱ्यात सापडला होता. आणि अजूनही वाद कायम आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पाहिल्यादिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ह्या चित्रपटाला मिळाला असून, आज ह्या चित्रपटाचा तिसरा दिवस आहे व तिसऱ्या दिवशीही ह्या चित्रपटाने चांगलीच धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर (Box Office) घातली आहे. ४० कोटी रुपयांच्या बजेट मध्ये हा चित्रपट बनविण्यात आला असून, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.

चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. केरळ मधल्या हिंदी व ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या (Love Jihad) जाळ्यात अडकवून कशा पद्धतीने धर्म परिवर्तनास बळी पडले जाते. त्यांच्यावर झालेला अमानुष अत्याचार, कस त्यांना ISIS चे दहशतवादी बनवण्यात येत. हे सर्व ह्या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या अदा शर्माने आपल्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे. सोबतच योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

‘द केरळ स्टोरी’ ची कमाई

शुक्रवार – 8.03 कोटी रुपये
शनिवार – 12.50 कोटी रुपये
एकूण – 20.53 कोटी रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.