दखल : ऐनपुरात ब्रेक लागलेल्या जल जीवन मिशनच्या कामाला गती

0

ऐनपूर ता रावेर:(इकबाल पिंजारी)

ऐनपुर येथील जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरू होऊन अचानक कामाला ब्रेक लागले होते, त्यासाठी दि.२३मार्च रोजीच्या दै.लोकशाहीत “ऐनपुरात जलजीवन मिशनच्या कामाला ब्रेक….” या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते,त्या वृत्ताची दखल घेत. गेल्या आठ दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली असून जलद गतीने काम सुरू झाले आहे.

सविस्तर असे की,शासनाच्या ‘हर घर जल’ जल जीवन मिशन अंतर्गत ऐनपुर येथे काही महिन्यांपूर्वी कामास सुरवात झाले होते त्यात पाण्याची टाकीचे काम सुरु असतानाच काही दिवसातच या कामाला आठवड्या भरापासून ब्रेक लागल्याचे दिसून येत होते, चालू काम थांबल्यामुळे अवकाळी पावसामूळे उघडी असलेली स्टील गंजण्याची व त्याची मजबुती कमी होण्याची दाट शक्यता होती व इतर संभाव्य नुकसान होण्याची शक्यता होती. हे काम बंद पडल्यामुळे नागरीक संभ्रमात पडून वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.
अशावेळी दै लोकशाही या वृत्तपत्रात ‘ऐनपुरात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाला ब्रेक’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून होणाऱ्या संभाव्य नुकसानीची बाब लक्षात आणून दिली होती याची शासन प्रशासनाने दखल घेत कामाला जलद गतीने सुरवात झालेली आहे.

स्टील चेकिंग करून कास्टींग झालेली आहे, काम जलद गतीने चालू झालेले आहे तसेच सदर काम नियोजित कालावधीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
कॉन्ट्रॅक्टर- नारायण गायकवाड

 

Leave A Reply

Your email address will not be published.