पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुतीक नवा ट्विस्ट…

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasbah Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागांसाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. कसबा पेठ येथील जागेवरून राष्ट्रवादी (NSP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) स्पर्धा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षाचे नेते ही जागा आपणच लढविणार असल्याचा दावा करत आहेत. पिंपरी चिंचवड येथील जागा राष्ट्रवादी लढविणार असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला ही निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी नुकतीच मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीत आम्ही त्यांच्याकडे पिंपरी चिंचवडची जागा मागितली आहे. तेथील जनतेचाही तसा आग्रह आहे, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.