पुणे येथे चितोडे वाणी समाजाचे स्नेह संमेलन उत्साहात

0

लोकशाही न्युज नेटवर्क
दरवर्षाप्रमाणे गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठान पुणेतर्फे पुणे परिसर समाज बांधवांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले. स्नेह संमेलनाची सुरूवात संस्थापक अध्यक्ष डी.एस गडे, निलकंठ बजाज, शरदचंद्र अट्रावलकर, ज्योती वाणी व डॉ. मोहन वाणी, अध्यक्ष दिपक वाणी यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने झाली. डॉ. मोहन वाणी यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सकाळच्या सत्रात रमेश दिवेचा यांनी भगवत गीतेवर उत्कृष्ट व सोप्या भाषेत माहिती सांगितली.

चिवास प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक वाणी यांनी मागील तीन वर्षाचा अहवाल वाचून दाखवला. कार्यकारिणीचा कालावधी संपल्यामुळे नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली. धीरज पाटील यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सर्वानुमते ठरवण्यात आले की, पुणे परिसरात विभागाप्रमाणे कार्यकारिणी समिती बनवण्यात यावी. त्याप्रमाणे पुणे शहर, कोथरूड, पिंपरी-चिंचवड, नगररोड, बिबवेवाडी, वारजे, सिंहगड रोड इत्यादी विभाग करुन प्रत्येक विभागासाठी विभागप्रमुखांची निवड करण्यात आली. तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अव्दैत पाटील व जान्हवी गडे यांनी स्पर्धेचे आयोजन केले.

दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात प्रिया मिलिंद वाणी यांनी प्रार्थनेने केली. अव्दैत धिरज पाटील याने तबला व ऋषिकेश चेतन श्रावगी याने हार्मोनियमने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यांनतर आदित्य अजय भार्गव याने हिंदी गाणे गायले. व स्वानंदी व स्पंदन निलेश वाणी यांनी शास्त्रीय संगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उर्वी स्वप्निल वाणी, आरोही निलेश सावदेकर तसेच स्वराली अमोल पाटील यांनी डान्स सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमामुळे सर्व समाज बांधवांनी स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. १० वी १२ वी व इतर परिक्षामधे प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व स्पर्धत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. संदिप वाणी यांनी सर्वांचे आभार मानले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाला १७५ समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवीला. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी. एस. गडे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष दिपक वाणी यांनी अहवाल वाचन केले. तसेच धीरज पाटील यांची पुढील तीन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून नाव सुचविले व निलकंठ बजाज, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी त्यांना अनुमोदन देऊन सर्व उपस्थित सदस्यांच्या सहमताने ही निवड करण्यात आली.

चितोडे वाणी समाज प्रगती प्रतिष्ठान पुणे नविन कार्यकारिणी खालील प्रमाणे :
धीरज पाटील – अध्यक्ष, ज्योती वाणी – उपाध्यक्ष, जगदीश गजऋषी – सचिव, शुभदा बऱ्हाणपूरकर, पराग अकोले – सह-सचिव, स्‌द्स्या संदीप वाणी – कोषाध्यक्ष, तेजस रावेरकर – सदस्य, संदेश गडे – सदस्य, शिल्पा पाटील – सदस्या, शुभदा बऱ्हाणपूरकर – सदस्या

संपूर्ण पुण्यातील विभागवार सदस्यांची विभागप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्यांची नावे खालीलप्रमाणे :
१) सिंहगड परिसर : सौ. मनिषा गजक्रषी, चेतन श्रावगी, श्रीकांत गांधी
२) बिबवेवाडी परिसर : सौ. शिल्पा पाटील, महेंद्र पाटील
३) औंध, बाणेर परिसर : सुहास वाणी
४) कोथरुड परिसर: सौ. शुभदा बऱ्हाणपूरकर,  उमेश गोडे
५) खराडी, वाघोली, नगर रोड : . राजेंद्र खारुळ, श्रेयम अकोलेकर
६) पिंपरी चिंचवड निनाद गडे, राहुल गडे
७) चाकण: पंकज वाणी
८) निगडी, भोसरी : योगेश वाणी,  राजेंद्र वाणी, सौ. वसुधा वाणी
९) वारजे: अजय भार्गव, प्रितम गडे
१०) दिघी, आळंदी, चऱ्होली : सचिन सांगवीकर
वित्त सल्लागार : स्वप्निल वाणी, महेश गर्गे

Leave A Reply

Your email address will not be published.