लोकशाही न्युज नेटवर्क
२३ जानेवारीला सोन्याच्या दराने महिन्यातील विक्रमी दर गाठला होता . मात्र २४ जानेवारीपासून सोन्याच्या भावात प्रति १० ग्राममध्ये घसरण झाली असून जळगावच्या सुवर्णनगरीत आज शुक्रवार २७ रोजी सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घट होऊन ५६ हजार ८९० रुपये प्रति १० ग्राम इतका भाव मिळाला.
तर दुसरीकडे चांदीच्या भावात प्रतिकिलो किंचित ४० रुपयांची घसरण होऊन ६८ हजार ७८० रुपये इतका भाव शुक्रवारी दिसून आला. सोने व चांदीच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे.