मुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा स्थगित, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांचा जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ साठीचा २६ ऑगस्टला होणार पाचोरा दौरा स्थगित झाला आहे.

नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील (Raosaheb Patil) व उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील त्यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाख गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हानिहाय सुरु आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, मंत्री उदय सामंत (Uday Samant), पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), गिरीश महाजन (Girish Mahajan), अनिल पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरु असलेल्या औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडासंकुल यांसह विविध विकासकामांचे देखील भूमिपूजन व उदघाटन केले जाणार आहे.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर झाले असून, याबाबत आमदार किशोर पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन नियोजन केले आहे. दरम्यान, २६ ऑगस्टला होणार स्थगित झाला असून, नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.