मुक्ताईनगरमध्ये युवासेनेतर्फे शुद्धीकरण आंदोलन

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुक्ताईनगर मध्ये दि. 20 सप्टेंबर रोजी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आणि सरकारमधील काही मंत्री गण विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरमध्ये आलेले होते. मुख्यमंत्री मुक्ताईनगरमध्ये आल्यानंतर प्रवर्तन चौकातील महापुरुषांना अभिवादन करून कोथळी रोडवरील ग्राउंडवर सभा आयोजित केली होती. ही सभा आटोपून सर्व मंत्री महोदय हे कोथळी येथील मुक्ताई मंदिर येथे आदिशक्ती संत मुक्ताईचे दर्शन घेऊन सर्व ताफा जळगाव रवाना झालेला होता.

आज दि. 21 सप्टेंबर रोजी युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रवर्तन चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून “पन्नास खोके एकदम ओके” अशा घोषणा देण्यात आल्या.  “गद्दारांना क्षमा नाही” अशी घोषणाबाजी करण्यात आली.  तसेच कोथळी येथील आदिशक्ती संत मुक्ताई मंदिरात जाऊन मंदिराच्या गाभारा स्वच्छ धुवून गोमूत्र शिंपडून मुक्ताई मंदिरामध्ये शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाप्रसंगी युवासेना सोशल मीडिया शहर प्रसिद्धीप्रमुख सुमेरसिंग राजपूत, सोनू बडगुजर, सचिन हीरोळे, सुमित हीरोळे, पारस हीरोळे, दीपक घुले, तुषार कोळी, महेश खुळे, राजू सोनवणे, तुषार सलावत, शत्रुकन सलावत, निलेश हीरोळे, मुन्ना बोदडे, मयूर वानखेड़े, रविराज वानखेड़े, रोहन भोई, यश गवई, प्रतीक वाघ, विवेक हीरोळे, सौरभ हीरोळे, अजय सपकाळे, निशांत झाल्टे, परेश तायड़े, रोहन महाले, अक्षय कचरे  आदि उद्धव ठाकरे शिवसेना समर्थक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.