आयएमआर ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

के.सी. ई. सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव ही खान्देशातील पहिली एन.बी.ए. अॅक्रीडेटेड MBA Program साठी मॅनेजमेंट संस्था म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. आपल्या संस्थेकडून के.सी.ई.च्या अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त मिळवलेली ही विशेष उपलब्धी आहे. या महत्वपूर्ण यशामागे संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची दुरदृष्टी आणि मार्गदर्शन असल्याचे आय. एम. आर. च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी नमूद केले.

नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन हे बोर्ड ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांच्या अंतर्गत काम करते. उच्च व तंत्र शिक्षणात उच्च गुणवत्ता आणि दर्जा याचा मापदंड म्हणून या अॅक्रिडेशनला अत्यंत महत्व आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बेस्ट प्रॅक्टीसेस आपल्या संस्थेत आहेत की नाही हे येणारी कमिटी चेक करते. आय. एम. आर. ला भेट दिलेल्या कमिटीत हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सुनिल कुमार गुप्ता, प्रा. डॉ. दिपक टंडन, आय. आय. एम. दिल्ली हे शिक्षण तज्ञ होते.

या मान्यतेमुळे आता महाराष्ट्रातील टॉप मॅनेजमेंट संस्थांच्या रांगेत के.सी.ई.आय.एम.आर. ने आपले स्थान निर्माण केले आहे. तंत्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी हे औद्योगिक जगतात लागणारे कौशल्यप्राप्त आहेत. ह्याची पडताळणी करणारी ही एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा नियंत्रित केली जाते ती जनरल कॉन्सिल आणि एक्झीक्युटीव्ह कमीटी मार्फत आउटकम बेस शिक्षणप्रणाली तपासण्यासाठी वॉशिग्टन या जागतिक पातळीवरील शिक्षण प्रणालीचे मापके वापरली जातात. अशा प्रकारच्या कठीण तपासणी यंत्रणेला सामोरे जावून अॅक्रिडेशन मिळवणारी के.सी.ई.चे आय.एम. आर. ही खान्देशातील पहिली व्यवस्थापन संस्था आहे.

संस्थेच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आय. एम. आर. च्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या अॅकेडेमिक डीन डॉ. तनुजा फेगडे, एन. बी. ए. कोऑर्डनेटर डॉ. पराग नारखेडे आणि आय. एम. आर. येथील प्राध्यापकांच्या टीमचे अभिनंदन केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.