Saturday, October 1, 2022

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम; सुनावणी ढकलली पुढे

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता संघर्ष सुरु आहे. शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी सरकार  स्थापन केले. तेव्हापासून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठा सत्तासंघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेना पक्षासह धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाने आपला दावा केला. दरम्यान हे सर्व प्रकरण आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेले आहे. त्यामुळे आता नेमकी शिवसेना कोणाची ?  याविषयी कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पूर्वी 1 ऑगस्टला त्यावर सुनावणी होणार होती. आत्ता 3 ऑगस्टला होणार असल्याचे कोर्टाकडून जाहीर केले आहे. 16 आमदारांच्या निलंबन प्रकरणी अद्याप सुनावणी बाकी असून त्याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून मोठा वाद सुरु आहे.

दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ आणि कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. आता नेमकं निकाल कोणाकडून लागणार  याकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुक आयोगाच्या नोटीशीनंतर शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई केली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या