महिलांना विनामूल्य पिंक रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण जळगावात विनामूल्य सुरू करण्यात येणार आहे. दि. १५ जुलैपासून २५ जुलै २०२२ पर्यंतच्या बॅच साठी ज्या महिलांना आपले नाव नोंदवायचे असेल त्यांनी मराठी प्रतिष्ठान गणपती नगर या ठिकाणी दि.१ जुलै ते १० जुलै पर्यंत संपर्क साधावा. असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

जळगाव शहरांमध्ये मराठी प्रतिष्ठान च्या प्रयत्नाने गेल्या तीन वर्षापासून पाच महिला यशस्वीरित्या रिक्षा चालवत आहे. नुकतेच पंधरा महिलांनी ट्रेनिंग पूर्ण केले आहे. त्यांना लवकरच पिंक रिक्षा वितरित केली जाणार आहे. महिलांनी मोठया संख्येने रिक्षा व्यवसायामध्ये यावं व सन्मानपूर्वक आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करावी, या करता मराठी प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील आहे.

महिलांना रिक्षाचे ट्रेनिंग मोफत असून लायसन्स, बॅच व परमिटचे पैसे शासकीय दरानुसार द्यावे लागणार आहेत. मराठी प्रतिष्ठान तर्फे रिक्षा घेण्यासाठी विविध बँकाच्या माध्यमातून कर्ज प्रकरण करण्याकरता पाठपुरावा देखील करण्यात येईल. दरम्यान रिक्षा प्रशिक्षणा करीत दि.०१ जुलै पासून नाव नोंदणी सुरू होणार असून आधार कार्ड, पॅनकार्ड, एक फोटो व अर्जासह नोंदणी करता येईल.

नाविन्यपूर्ण व्यवसायात आवड असणाऱ्या महिलांनी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर, विश्वस्त संध्या वाणी, अनुराधा रावेरकर, निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.