Sunday, January 29, 2023

ब्रेकिंग.. आज सायंकाळी सात वाजता होणार शपथविधी

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राजकीय घडामोडींवर लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राज्यात पुढील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांची शपथ घेणार असून नंतर ते संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे दुपारी सव्वादोनच्या सुमारास मुंबईला पोहचले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असून दोन्ही मान्यवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा दाखल करणार आहेत. शिंदे यांच्या मुंबईतील आगमनाप्रसंगी काहीही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून कडेकोटे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरम्यान,  आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे