Thursday, February 2, 2023

प्रशासनाविरोधात बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

- Advertisement -

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने मागण्यांसाठी दि. ३० जून रोजी  प्रशासना विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. ३० दिवसांच्या आत मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन तिव्र करून आमरण उपोषण प्रारंभ केले जाईल असे सांगितले.

१) कु. कविता रमेश पाटील डाटा एन्ट्री ऑपरेटर सह एकूण जिल्ह्यातील ६ कर्मचान्यांना २ वर्षांच्या पगारासह फायदा देवून त्यांना जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत समाविष्ट करणे.

- Advertisement -

२) दिनांक १६/०३/२०११ रोजी रामलाल सोनवणे स्वीपर प्रा. आ. केंद्र वाकडी ता. जामनेर येथे मयत झाल्याने त्यांची पेन्शन केस व पेन्शनचे लाभ तात्काळ मिळणे बाबत.

३)  मनोज पाटील सिकल सेल जिल्हा समन्वयक जिल्हा आरोग्य विभाग जळगांव यांचे बाबत गंभीर तक्रार असून महिलांची शरीरसुख मागणी केल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील ५ महिलांनी नोकऱ्या सोडल्याने त्यांना ताबडतोब नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे.

४) जिल्हा आरोग्य विभागात समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. शाकीर शेख यांची समुदाय वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्काळ नियुक्ती करणे बाबत व डॉ. पवन राजपुत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेवर गंभीर आरोप असल्याने त्यांना तात्काळ निलंबीत करणे बाबत.

५) जिल्हा आरोग्य अधिकारी भिका शंकर जमादार जिल्हा आरोग्य अधिकारी जि. जळगांव यांनी कोणत्याही अधिकाऱ्यावरती आतापर्यंत कार्यवाही न केल्याने कर्मचारी वर्गात कुतुहल निर्माण झाले आहे व सदर अधिकारी ३० जून २०२२ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने ते कार्यवाही करण्यास धजावत नाहीत. म्हणून त्यांना सेवानिवृत्त करण्यात येवू नये.

६) प्रतिभा सुर्वे (कक्ष अधिकारी) सध्या प्राथमिक शिक्षण विभाग जि.प. जळगांव यांची खाते चौकशी सुरू असतांना महिला व बालकल्याण अधिकारी राऊत साहेब यांनी स्थगित केल्याने या दोघांवरती प्रशासकीय कार्यवाही करणे बाबत.

७)  विलास कोळी आरोग्य सेवक यांना मानीव दिनांकाबाबत प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागात पेंडींग ठेवल्याने संबंधित कर्मचाऱ्यांस तात्काळ निलंबीत करण्यात यावे.

८) जिल्हा आरोग्य विभागात काही कर्मचारी मद्यप्राशन करून कामावर येतात. त्यांची पोलीसांमार्फत चौकशी करून मद्यप्राशना बाबत चौकशी करण्यात यावी.

९) चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना प्रा. आ. केंद्र नशिराबाद ता. जि. जळगांव यांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली ज्या संबंधित कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल केलेला असून संबंधित कर्मचाऱ्याला आतापर्यंत निलंबीत का करण्यात आले नाही? आरोपीच्या पाठीशी आपले शासन आहे काय ?

१०) मागासवर्गीय कर्मचारी / अधिकाऱ्यांबाबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे विषयी संयुक्त मिटींग घेवून तात्काळ निर्णय घेण्यात यावे.

११) प्रा. आ. केंद्र नशिराबाद ता. जि. जळगांव येथील कर्मचारी सफाई कामगार कर्मचारी पंकज डाभोरे यांनी अॅट्रॉसिटी अॅक्ट खाली पंढरीनाथ कोळी वर्ग-३ चे कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराला आतापर्यंत बडतर्फ का करणेत आले नाही ? गुन्हा दाखल असून जिल्हा परिषदेने चौकशी का केली नाही ? सदर प्रकरण दाबण्याचे काम जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे व डॉ. पवन राजपुत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी हे संगनमताने आरोपीच्या पाठीशी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता तात्काळ बडतर्फ करून मागासवर्गीय कर्मचान्याला न्याय द्यावा.

वरील प्रमाणे दिनांक ३० जून २०२२ रोजी सर्व मागण्या मंजूर करून आम्हांला न्याय मिळावा. न्याय न मिळाल्यास पुढील महिन्यात आम्ही आपले विरोधात आमरण उपोषण करणार असे.  विनीत पाटील, सुनील धाडी, गजानन पाटील, अनिल पाटील, कविता पाटील, दीपक शिंपी, विवेक पाटील यांनी सांगितले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे