राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या होणार फैसला

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis), 16 आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेसह एकूण चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्ता संघर्षावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे.

हे देखील वाचा:-

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

विधी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना अपात्र ठरवल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार कोसळू शकतं. तर सरकारच्या बाजूने निकाल आल्यास येत्या चार दिवसात राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच शिवसेनेचं (shivsena) अस्तित्वही अवलंबून आहे. त्यामुळे उद्याचा निकाल कुणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येणार हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालावर शिवसेनेचं (shivsena) अस्तित्वही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकूण चार याचिकांवर सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवरही उद्याच सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. शिवसेना कोणाची हा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्या, असं शिंदे गटाने याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्ट घटनापीठाची स्थापना करणार का? की कोर्ट काही आदेश देणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. उद्याच्या सुनावणीवर शिंदे-फडणवीस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.

या आहेत चार याचिका

1. एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान.

2 . राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशांना आव्हान.

3. शिंदे गटाच्या प्रतोदाला शिवसेनेचा प्रतोद म्हणून मान्यता देण्यास आक्षेप.

4. एकनाथ शिंदे यांचा शपथविधीला आणि विशेष अधिवेशनाला आक्षेप.

Leave A Reply

Your email address will not be published.