अंजनी प्रकल्पासाठी २३२ कोटी – आमदार चिमणराव पाटील

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्पासाठी (Anjani Dam) २३२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाच्या कामाला २३२ कोटी रुपये खर्चासाठीच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आहे. एरंडोलसह परिसरातील अनेक अनेक गावांना प्रकल्पामुळे हा फायदा होतो. त्यामुळे अंजनी प्रकल्पाला वाढीव निधीची आवश्यकता होती.

यामुळे शेतकर्‍यांना (Farmers) बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचा लाभ मिळणार आहे. एरंडोल तालुक्यातील सुमारे २०६८ हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील ७६२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अंजनीप्रकल्पासाठी लागणार्‍या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे, प्रकल्पाची सिंचन क्षमता पूर्ण होऊन, सुमारे २८३१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली होती. यामुळे सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.