सौमय्यांनी INS विक्रांतचा निधी हडप केला; राऊतांचा गंभीर आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते किरीट सौमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होताय. त्यातच काल संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत राऊत यांची संपत्ती जप्त केली. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच आहे. यांनतर संजय राऊत यांनी देखील किरीट सौमय्या यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत.

दरम्यान किरीट सौमय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नील सोमय्या तसेच वाधवान कुटुंबीय यांचे आर्थिक संबंध असल्याचे पुरावे देण्यात आले. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी धक्कदायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे.

आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी गोळा करून तो हडप केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

दरम्यान सोमय्यांनी पुरावे मागितल्यावर राऊत चांगलेच संतापलेत. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव दिल्लीत शिजतोय आणि त्या कटाचे सूत्रधार सोमय्या आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

भारतीय नौदलातून निवृत्त झालेली आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी लोकांकडून पैसे जमा केले. साधारणपणे 57 ते 57 कोटी रूपये सोमय्यांनी जमा केले. ते पैसे राजभवनाकडे देणार असल्याचं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. पण ही रक्कम राजभवनाकडे आलीच नाही असं आरटीआयमधून उघड झालंय.

किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ही कीड मी संपवणार, असा थेट हल्लाबोल संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर चढवला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचविण्याच्या नावाखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपये हडप केले आहेत, असा आरोप केला. यासाठी संजय राऊत यांनी राजभवनाच्या पत्राचा दाखला दिला. राजभवनाकडून आलेले पत्र पुरावा नाही का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

तसेच संजय राऊत सोमय्यांवर आणखी आरोप करत म्हणाले की, सेव्ह विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी कोट्यवधी रक्कम जमा केले. ही रक्कम राजभवनात जमा केला नाही ?. सोमय्यांनी निधी मुलाच्या कंपनीसाठी वापरला. सौमय्या सीए असल्याने पैसा कसा जिरवायचा हे त्यांना चांगलेच माहितीय.
आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी अनेक माजी सैनिकांनी यासाठी निधी दिला. याची सीबीआय, ईडी, आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.