मैदान कोणाच्या….नाही; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट तयार झाला. या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. तर आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात चांगलाच वाद जुंपला आहे.

मैदान हे कोणा एकाच्या मालकीचं नाही

मुंबईतील शिवाजी पार्कवर आपला दसरा मेळावा व्हावा यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहेत. यावरून आता गुलाबराव पाटील यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबईचं शिवाजी पार्क मैदान हे कोणा एकाच्या मालकीचं आहे असं नाही. महापालिका ज्याला देईल त्याला ते मिळणार असल्याचं  गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 सप्टेंबर रोजीच्या जिल्हा दौऱ्याच्या नियोजनासाठी पाळधी  फार्म हाऊसमध्ये आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.

शिंदे गटाची रेकॉर्ड ब्रेक सभा

मुक्ताईनगर येथे होणार असून जळगाव जिल्ह्यातील शिंदे समर्थक मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याची जय्यत तयारी शिंदे समर्थक गटाकडून करण्यात आली असून ही सभा महाराष्ट्रातली शिंदे गटाची रेकॉर्ड ब्रेक सभा राहणार आहे. तसेच  राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काहीजण टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचं देखील राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.