पारोळा शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस उशिरा होणार आहे.

बोरी नदीला आलेल्या महापुरात पारोळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइप लाइनमध्ये पाण्याच्या अति प्रहावाने नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणी पुरवठा दोन उशिरा करण्यात येणार असल्याची माहिती पारोळा नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तरी शहरातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, पाण्याचा वापर काटकसरीने करा व प्रशासनास सहकार्य करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.