मुख्यमंत्री शिंदेंकडून आ. गुलाबराव पाटलांवर मोठी जबाबदारी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत.

आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत (MLA Uday Samant), किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली आहे. तर बाकी शिलेदारांना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यांमुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे

शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.