“श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा ६ मे रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात प्रयोग…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेल्या “श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत सौ.मंजुषा अडावदकर यांनी दिली.

शेगावचे सुप्रसिध्द श्री गजानन महाराज यांचे देवस्थान सर्व भक्तांना परिचित आहे. त्यांच्या जीवनावरील कथानकाचे नाट्यरुपांतर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर करण्यात येणार आहे. या नाटकाचे लेखक डॉ. रवि गोऱ्हे असून, दिग्दर्शन सारिका पेंडसे यांनी केले आहे. नाटकाचे सूत्रधार संजय पेंडसे, मार्गदर्शक डॉ. जयंत वेलकर, नेपथ्य सतीश पेंडसे, प्रकाशयोजना किशोर बत्तासे, पार्श्वसंगीत मधुरिका, ऑ.ऍड. आर्यन भाटी, निर्मिती सहाय्य मेघा गोऱ्हे, पुष्पक रुके, मिहीर अवचित आणि ह.भ.प. कृष्णा रामेकर यांचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.