माजी आ.स्मिता वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषणा नुकतीच झाली आहे. यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कार्यकारणीत सक्षम, क्रियाशील आणि संघटनात्मक कौशल्य अवगत असणाऱ्या पदाधिकार्यांना स्थान देण्यात आले आहे. या नियुक्तीने अमळनेर मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले आहे.

विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी परिषद व चळवळीच्या माध्यमातून भाजपशी जोडल्या गेलेल्या स्मिता वाघ पुढे भाजपाकडून निवडणूक लढवून जिल्हा परिषदेच्या सदस्य नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यानंतर विधान परिषद सदस्य पदाची मोठी संधी त्यांना पक्षाने दिली. या पुढेही पक्षाने त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देत राहिला. दरम्यानच्या काळात जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेश महिला अध्यक्ष, मुख्य कार्यकारिणीत प्रदेश चिटणीस नंतर उपाध्यक्ष व आता पुन्हा नव्या कार्यकारिणीत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. सदर नियुक्तीबद्दल स्मिता वाघ यांचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, जिल्हयातील सर्व आमदार, खासदार, जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्मिता वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.