मुळशीच्या शेतकऱ्यानं पिकवली तुर्कीची बाजरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क –

सध्याच्या काळात मोठ्या शहरांच्या शेजारची शेती जवळपास संपत चालली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातही सिमेंटचं जंगल वाढत आहे. त्यासाठी अनेक शेतकरी आपल्या जमिनी विकत आहेत. पण याच तालुक्यातील जांबच्या शेतकऱ्यानं आपल्या शेतात अनोखा प्रयोग केला आहे. या बाजरीचे वैशिष्ट्य म्हणजे तब्ब्ल 11 फूट उंची अन् 3 फुटाचं कणीस या बाजरीचे आहे.
शेतकरी अविनाश गायकवाड यांनी तुर्कीच्या बाजरीची शेती केलीय. देशी वाणापेक्षा तब्बल चौपट उत्पन्न तुर्की बाजरीतून मिळते. त्यामुळे ही शेती फायद्याची ठरत असल्याचे गायकवाड सांगतात.
शेतकरी अविनाश गायकवाड हे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. सोशल मीडियावरून शेतीशी संबंधित माहिती घेत असतात. एकदा त्यांना नाशिकमधील शेतकऱ्याने केलेल्या तुर्की बाजरीची माहिती मिळाली. यावर आपल्याही शेतात त्यांनी बाजरीचे हे पीक घेण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधील संबंधित शेतकऱ्याकडून बियाणे मिळवून तुर्की बाजरीची पेरणी केल्याचे गायकवाड सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.