आम्ही बहिणभाऊ नाही तर एकमेकांचे वैरी- धनंजय मुंडे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राजकारणामुळे (Politics) अनेक घरांमध्ये वाद झाल्याचे आपण पाहिले असतील. त्यातच एक मोठं उदाहरण म्हणजे पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धंनजय मुंडे (Dhananjay Munde).

त्यांनी आत्मपरीक्षण करावं

धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले की, आमचं आता बहीण भावाचं नात राहिलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. राजकारणातून नात्यात वैर निर्माण झालं आहे. नातेसंबंध अगोदर होते असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. तसेच वारंवार त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.

सातत्यानं संघर्ष

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात सातत्यानं संघर्ष होत असतो. कायम हे दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतात. यामुळे बीड (Beed) जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यावेळी धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तर पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होत्या. दोघेही चुलत भाऊ-बहीण असल्यानं या निवडणुकीला वेगळं महत्त्वं आलं होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.