कडक उन्हातही टू व्हीलरचे सीट राहणार थंड; रायसोनीच्या विद्यार्थ्यांचा शोध

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

उन्हाळ्यात उन्हाचा पारा नेहमी ४० अंशांवर जात असतो. यामुळे अनेकजण घराच्या बाहेर पडताना रूमाल, पांढरा गमचा, टोप्यांचा वापर करू लागतात परंतु, दुचाकीवर जाणाऱ्यानी डोक्‍यावर रूमाल बांधला तरी सीट गरम होवून त्यांना उन्हाचे चटके बसतात. उष्णतेने हैराण होऊन अलीकडेच बरेच लोक त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताना दिसतात. कुणी गाडीच्या बोनेटवर पाणी गरम करतांना तर कुणी ऑम्लेट बनवताना मुख्यत्वे नेहमी दुचाकीवर व्यवसायासाठी किंवा अन्य कामांसाठी फिरणाऱ्याना याचा मोठा त्रास होतो.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिक विभागातील तुषार सपकाळे, दर्शना राणे, तोशिता राणे, अदिती शिंदे या विद्यार्थ्यांनी व प्रा. बिपाशा पात्रा व प्रा. मधुर चौहान या प्राध्यापकांनी “मुव्हेबल टु व्हिलर सीट कव्हर” तयार करत उन्हाळ्यातल्या या गंभीर समस्येवर चांगलीच शक्कल लढवली आहे. त्यांनी दुचाकीच्या सीटवर पुढे व मागच्या बाजूस दोन हुक लावत, उन्हाळ्यात या हुकच्या सहाय्याने सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम सुतावर कार्बन नॅनोट्यूबचे कोटिंग केलेले एक जाड कापड जे कि उन्हापासून सीटचे संरक्षण करत सीटच्या मापा एवढाच हा कापड सीटवर आच्छादला जाईल व दुचाकी मालक पुन्हा आल्यावर तो हा कापड पुन्हा सीटवरून काढून सीटच्या मागील बाजूस बसवलेल्या छोट्याश्या बॅगेत हा कापड लॉक करेल.

इतकी सहज शक्य व मध्यमवर्गीयांना परवडेल अशी हि पद्धत असून भविष्यात जगभरात कौतुकास्पद ठरणाऱ्या या “मुव्हेबल टु व्हिलर सीट कव्हर”ला नुकतेच पेटंट प्रदान करण्यात आले आहे. भविष्यात सामान्य जनतेसाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरणार असून ऑटोमोबाईल क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अॅकडमीक डीन प्रा. डॉ प्रणव चरखा यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करतांना नमूद केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.