ठाकरे- शिंदें २ दिवसात भेटणार; दीपाली सय्यद यांचा दावा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सत्तासंघर्ष होवून शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडून शिवसेनेला लागोपाठ धक्के बसत गेले. तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठा वाद सुरु असतांना एका दाव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/deepalisayed/status/1548358677635076116?s=20&t=5ex6IsaqIVxfxo8CaFdL0A

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटवरून केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या एक-दोन दिवसांत भेट हेणार असल्याचा दावा सेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केला आहे. या दोघांनाही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर आहे. त्यामुळे त्यांची भेट होणार असल्याचे समजल्याने खूप चांगले वाटत आहे, असे सय्यद आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्यात. या ट्विटमध्ये त्यांनी भाजप नेत्यांचेही आभार मानलेत.

दीपाली सय्यद यांचे ट्विट 

दिपाली सय्यद या बंडाच्या वेळेपासूनच शिंदे आणि ठाकरे यांनी एकमेकांशी चर्चा करावी, अशी भूमिका घेत होत्या. त्यांनी 16 जुलैला रात्री 11 च्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की- येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.

पंकजा मुंडें, विनोद तावडेंनी मध्यस्थी ?

तसेच दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये पंकजा मुंडें, आणि विनोद तावडे यांना टॅग करण्यात आले आहे. यांच्या मध्यस्थीने ही चर्चा होण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंकजा मुंडेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बहिण मानतात तर राज्याच्या राजकारणात सक्रिय नसलेले विनोद तावडे हे देखील राष्ट्रीय राजकारणात मोठ्या पदावर असून ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.