३५ वर्षीय तरूणाची गळफास घेत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. अरविंद देवीदास इंगळे (वय ३५, रा. सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परिसर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

अरविंद इंगळे हा तरूण आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह सम्राट कॉलनीत वास्तव्याला आहे. वेल्डिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. शनिवारी १६ जुलै रोजी रात्री १० वाजता घरात सर्वजण एकत्र जेवन करून झोपले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा प्रकार त्याच्या घरच्यांना समजल्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रविवारी १७ जुलै रोजी सकाळी जिल्हा शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत अरविंदच्या पश्चात वडील देवीदास झोपा इंगळे, आई रंजना, मोठा भाऊ सुधीर आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.