उत्तर भारतीयांची मते राज ठाकरे कशी मागणार?

काँग्रेसचा ‘मनसे’ सवाल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर भारतीयांना लाढ्या काठ्या मारणारे मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांकडे कसे मत मागतिल असा खोचक सवाल काँग्रेसने विचारला आहे. मनसेला उतरती कळा लागत असल्यानेच ते भाजपाच्या गोटात दाखल होत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीतील या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, दिल्लीतील या भेटीगाठीनंतर मनसेतील पक्षांतर्गत घडामोडींना वेग आला आहे. मनसेच्या नेतेमंडळींची तातडीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली असून, या बैठकीनंतर काही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह सोमवारी रात्रीच दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष मंगळवारी राज ठाकरे-अमित शहा यांच्या भेटीकडे लागून राहिले. मंगळवारी दुपारी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईसह इतर काही जागांचा प्रस्ताव मनसेतर्फे देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मात्र याबाबत अद्याप अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.