मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आजपासून महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी चार वाजता ते आपल्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानातून निघतील.

या दौऱ्याला नाशिकपासून (Nashik) सुरुवात होणार आहे. आज रात्री मुख्यमंत्री मालेगावला (Malegaon) येणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी मालेगावमधील विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार आहेत. दरम्यान पहिल्यांदाच  नाशिकचे मुख्यालय सोडून मुख्यमंत्र्यांची बैठक ही मालेगावमध्ये होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मात्र मालेगावचे आमदार दादा भुसे (Malegaon MLA Dada Bhuse) हे शिंदे गटात सामील झाल्याने मुख्यमंत्र्यांनी बैठक मालेगावमध्ये ठेवल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे मनमाड चौफुलीवरील सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या कार्यालयाला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्याला सुरुवात होणार आहे. औरंगाबाद दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. 30 आणि 31 जुलै असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.

वैजापूर औरंगाबाद आणि सिल्लोड या तीन तालुक्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट देऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यासोबतच ते शिंदे गटात समील झालेल्या आमदारांच्या घरी देखील भेट देणार आहेत. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचीही मुख्यमंत्री भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची औरंगाबादेत जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांतच औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.