जळगाव जिल्हा दूध संघाची खुशाल चौकशी करा- एकनाथराव खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (NCP leader Eknathrao Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. खडसे यांच्या पत्नी अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघातील (Jalgaon Dudh Sangh) कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी शासनाकडून आता चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव एन. बी. मराळे यांनी दिले आहेत.

 हे देखील वाचा :-

जिल्हा दूध संघाची कार्यकारीणी बरखास्त… आ. मंगेश चव्हाणांची नियुक्ती

पारदर्शकपणे चौकशी व्हावी

चौकशी समितीत 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून 20 ऑगस्ट पर्यंत चौकशी करून तो अहवाल राज्य शासनाला देण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी (CM) हे आदेश काढले आहेत. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत. शासनाच्या मान्यतेने असे आदेश निघत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. जळगाव दूध संघाची चौकशी करण्यात येत असली तरी ती चौकशी अत्यंत पारदर्शकपणे झाली पाहिजे असेही खडसे म्हणाले.

खुशाल चौकशी करा

जळगाव दूध संघाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाची चौकशी खुशाल करण्यात यावी. मात्र ज्या प्रकारे ही चौकशी करण्यात येणार आहे ती करण्यात येत असलेली चौकशी अत्यंत पारदर्शकपणे करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेमलेले प्रशासक नियमबाह्य

जळगाव दूध संघामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सदर दूध संघातील व्यक्तींची चौकशीही करण्याची मागणी करण्यात आली होती, तरीही आता ही चौकशी करण्यात येत असून ही चौकशी राजकीय दबावापोटी होत असेल तर ती त्याप्रकारे चौकशी होता कामा नये. दूध संघावर जे प्रशासक नेमले आहे ते नियमबाह्य नेमण्यात आले आहेत, त्यामुळे हे चुकीचे आहे असे प्रशासक नेमण्याचा अधिकार या सरकारला नाही असंही खडसे म्हणाले.

मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत

मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले आहे मुख्यमंत्र्याच्या आदेशाने असे आदेश निघत नाहीत. शासनाच्या मान्यतेने या आदेश निघतात मात्र आता मुख्यमंत्र्यांनी हे आदेश काढले गेले आहेत, त्यामुळे जर चौकशी करण्यात येत असेल तर त्यांनी खुशाल चौकशी करावी असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.