धक्कादायक; विवाहितेला जिवंत जाळले… उपचारादरम्यान मृत्यू…

0

 

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एका विवाहितेला तिच्या प्रियकराने प्रेमसंबंधास नकार दिल्याने रॉकेल अंगावर ओतून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी सुनिजर वर्मा आणि त्याचा मित्र रमेश वर्मा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भिवंडी येथील अंजुरफाटा भागात पिडीत २५ वर्षीय विवाहित महिला राहत होती. तरीही तिचे सुनिजर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी तिचा त्याच्यासोबत वाद झाला. यातून तिने त्याला पुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतरही सुनिजर तिला त्रास देत राहिला, दरम्यान १९ ऑक्टोबर रोजी ती घरामध्ये एकटी असताना सुनिजर आणि त्याचा मित्र रमेश हे दोघे घरात शिरले आणि त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले. पेटलेल्या अवस्थेत ती बाहेर आली. नागरिकांनी आग विजवून तिला रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर नारपोली पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब नोंदवून घेतला होता. त्याआधारे पोलिसांनी सुनिजर आणि रमेश या दोघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सुनिजर आणि रमेश यांना अटकही केली. दरम्यान, उपचारादम्यान मंगळवारी या महिलेचा मृत्यु झाला. यानंतर पोलिसांनी दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.