2000 रुपयांच्या 97 टक्के नोटा आल्या परत – रिझर्व्ह बँक

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

चलनातून बाद करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत आणि आता लोकांकडे फक्त 10,000 कोटी रुपयांच्या नोटा उरल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही माहिती दिली. या वर्षी १९ मे रोजी रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली होती.

रिझव्‍‌र्ह बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, 19 मे 2023 रोजी व्यवसायाच्या समाप्तीवेळी चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. आता ते 31 ऑक्टोबर 2023 रोजी 10,000 कोटी रुपयांवर आले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत.

मात्र, आता या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार नाहीत. पण रिझव्‍‌र्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलून घेता येतील. दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी कामाच्या वेळेत आरबीआय कार्यालयात लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.