खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; आज प्रवेश शक्य

0

जळगाव ;- भाजप खासदार उन्मेष पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज सकाळी मुंबर्इत दाखल झाले असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करीत अशी माहिती समोर आलेली आहे. भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील हे नाराज झाले आहेत.

आज मंगळवारी सकाळी उन्मेष पाटील पत्नी संपदा पाटील, पारोळ्याचे करण पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहे. सुरुवातीला ते नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते; मात्र राऊत मातोश्रीवर असल्याने त्यांची भेट झाली नाही. जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याशी उन्मेष पाटील यांची चर्चा झाली असून श्री. पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.