चोराला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही; उद्धव ठाकरे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सात ते आठ महिन्यांपासून शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण ठाकरे गटाकडे जाते कि शिंदे गटाकडे जाते याची उत्सुकता सर्वांनाच  होती. आणि काल त्याचा निर्णय सर्वांसमोर आला. शिंदे गटालाच शिवसेनेचे चिन्ह मिळाले आहे. त्यानंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीबाहेर भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी ओपन कारमधून भाषण केलं. यावेळी उपस्थित शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आठवण आली. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची जेव्हा स्थापना केली त्यावेळी त्यांनी असेच सुरुवातीच्या दिवसांमध्ये गाडीच्या टपावरून भाषण केले होते. 30 ऑक्टोबर 1968 ला बाळासाहेब ठाकरेंनी जीपवर उभं राहत भाषण केलं होतं. त्याची आठवण यावेळी शिवसैनिकांना आली. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

तत्पूर्वी मातोश्रीसमोर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे धनुष्यबाण चोरीला गेले आहे. त्या चोराला आम्ही पकडले आहे. त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हला आव्हान करतो तुमच्यात हिम्मत असेल तर निवडणुकीत समोर या. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येऊ. मातोश्री बाहेर जमलेल्या शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आव्हान दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.