“छोटे मियाँ बडे मियाँ” च्या सेट वर घडला अपघात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार हा गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. सध्या तरी अक्षयचा सिनेमा येत नसला तरी तो कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत असतोच. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता, त्यावेळी अक्षय कुमार हा म्हणाला की, कपिल शर्मा (Kapil Sharma) याची नजर लागल्यामुळेच माझे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. मात्र,अक्षय कुमार हा मजाकमध्ये बोलला होता. मुळात म्हणजे कोरोनानंतरच बाॅलिवूडचे चित्रपट (Movie) बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

नुकताच अक्षय कुमार याच्या सेटजवळ अशी एक घटना घडली आहे की, ती ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसेल. छोटे मियाँ बडे मियाँ या चित्रपटातील अक्षय कुमारच्या मेकअप मॅनवर एका बिबट्याने हल्ला केला आहे. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या श्रावण विश्वकर्मा यांच्यावर बिबट्याने हल्ला केला.श्रावण त्याच्या बाईकवर होता आणि त्याच्या मित्राला चित्रपटाच्या सेटवर सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याची बाईक बिबट्याला धडकली आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. यानंतर मेकअप आर्टिस्ट बेशुद्ध झाला. पुढे काय झाले हे त्याला काहीच आठवत नाही आहे. तेथील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.