मजुराचा विहरीत काम करतांना मृत्यू…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील हिंगोणा येथे एका मजुराचा विहिरीत काम करत असतांना अंगावर माती पडून दाबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोणा येथील रहिवासी मुबारक रमजान तडवी (३२) या मजुराचा काम करत असतांना अंगावर माती पडल्याने मातीखाली दबुन गुदमरून मृत्यु झाला असुन, फैजपुर पोलीस स्टेशन ला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी कि, हिंगोणा येथील मजूर विहिरीवर काम करण्यासाठी दिनांक १७ फेब्रुवारीला हुना जयराम चोपडे यांच्या हिंगोणा शिवारातील शेतातील विहीरीवर रात्री गळ काढण्याच्या कामासाठी गेले असता, सुमारे १ वाजेच्या सुमारास अंगावर माती पडून, मातीखाली दाबुन गुदमरून  मुबारक रमजान तडवी या मजुराचा दुदैवी मृत्यु झाला आहे.

याबाबत शेतमालक हुना जयराम चोपडे यांनी दिलेल्या खबरी वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास फैजपुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक  सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे. मयत तडवी यांच्या पश्चात पत्नी, तिन मुल असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.