भडगावात साजरा होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एक महान आदर्श जाणता राजा, युगपुरुष व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून गेल्या आठवड्यापासून भडगाव शहरात शिवाजी महाराज चौक येथे स्व. बापूजी फौंडेशन तर्फे नियोजन करण्यात येत आहे.

दि.१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये शिवपूजन व आकर्षक देखावा, ढोल ताशा पथक, लाईट शो, बँड, डी. जे. फटाक्यांची आतिषबाजी आदी कार्यक्रम होणार आहे.

शिवजन्मोत्सवाच्या दिवशी भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींचे पूजन व महाआरती आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्वांनी या भव्य दिव्य शिव जन्मोस्तव कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा असे आवाहन आयोजक स्व. बापूजी फाउंडेशन चे संस्थापक लखीचंद पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.