“मिर्झापूर” फेम अभिनेत्याचे निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांचाच मनात एक वेगळी जागा निर्माण करणारे शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. टीव्हीसह बॉलिवूड आणि ओटीटीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ते 56 वर्षाचे होते. एका सत्कार समारंभात गेले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यामुळे ते तिथेच बेशुद्ध पडले. त्यामुळे त्यांना तात्काळ अंधेरीच्या कोकिळाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यता आलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये शाहनवाज प्रधान यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. या भूमिकेमुळेच ते घराघरात पोहोचले होते. मात्र, अचानक त्यांचं निधन झाल्याने बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.