मोठी बातमी : भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उन्मेष पाटलांनी बांधले शिव बंधन

0

मुंबई /जळगाव ;- भाजपचे खसदार उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा लोक सभाध्यक्षांना राजीनामा देऊन आज दुपारी आपल्या शेकडो समर्थकांसह  ठाकरे गटात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून मशाल हाती घेऊन पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून यामुळे भाजपला खिंडार पडले आहे.

भाजपाने जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेल्या २१ दिवसांपासून भाजपच्या बैठकींपासून अलिप्त असलेले उन्मेष पाटील हे नाराज असल्याने उद्धव बाळा साहेब गटाच्या नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करणं पवार यांच्या समवेत मंगळवारी उबाठा गटाचे जळगाव जिल्हा प्रमुख संजय सावंत यांच्यासह नेते खा. संजय राऊत यांची भेट घेऊन नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलतांना दिले होते.

त्यानुसार आज उन्मेष पाटील यांनी ११ वाजून ५० मिनिटाला लोकसभाध्यक्ष ओम जी. बिर्ला यांना राजीनामा पाठवून मगच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिव बंधन बांधून समर्थकांसह प्रवेश केला . यावेळी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील उन्मेष पाटील यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते.

ही पदाची, जय-विजयाची लढाई नाही तर ही स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची लढाई आहे. शासकीय योजनांचा पॅटर्न आता सुरू आहे तो आपण जळगावात सुरू केला होता. कोणतीही चिरीमिरी न देता केला. लोकांना पैसे देऊन आणलं नाही. पॉलिसी मेकरची किंमत नाही. काम करणाऱ्यांची कदर नाही. मला न विचारता दुसऱ्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली. देशातील पहिल्यांदा निवडून आलेल्या २९२ खासदारांमध्ये चांगलं काम करणाऱ्यात माझं नाव होतं.अशी प्रतिक्रियाया उन्मेष पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.