डॉ. योगेश्वरी पाटील यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

डॉ. योगेश्वरी भाग्यश्री दिनकर पाटील (क्षीरसागर) रा.  विरावली हिने  नुकतीच वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली, त्याबद्दल यावल  शहरासह तालुक्यातुन सर्वच स्तरातून  कौतुक होत आहे.

डॉ. योगेश्वरी  पाटील या साईबाबा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव माणिकराव पाटील व ताराबाई विरावली यांची नात असून साई बाबा संस्थेचे संचालक तथा  प्रगतशील शेतकरी दिनकर पाटील व  जि. प. शाळा सातोद येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी शिरपूर येथील के.डी.एम.जी होमिओपॅथ या महाविद्यालयातुन  वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना  प्राचार्य प्राध्यापक डॉ. बी. एस. पाटील, प्रा. डॉ. संजय रुद्र यांचे  मार्गदर्शन लाभले. डॉ. योगेश्वरीचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सत्कार केला. तसेच त्यांना अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.