धक्कादायक; आधी मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलले, नंतर जिवंत जाळले…

0

 

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एका ‘ट्रान्ससेक्शुअल’ व्यक्तीने एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची निर्घृण हत्या केली. हे दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, संशयिताची ओळख वेत्रीमारन अशी झाली असून तो ‘ट्रान्स’ पुरुष आहे. वेत्रीमारनने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीला, सॉफ्टवेअर इंजिनिअरला जिवंत जाळले.

आरोपीने आपले नाव पांडी माहेश्वरी (पूर्वीची महिला) वरून बदलून वेत्रीमारन केले होते. त्याने शनिवारी चेन्नईच्या दक्षिणेकडील उपनगर केलंबक्कमजवळील थलंबूर येथे वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपली मैत्रीण नंदिनीला सरप्राईज देण्याच्या बहाण्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्यानंतर तिला साखळदंड बांधून जिवंत जाळले.

पीडित 25 वर्षीय मदुराई येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती येथे काम करत होती. नंदिनीला त्याच्या हेतूबद्दल शंका नव्हती कारण वेत्रीमारनने सांगितले होते की तिला तिच्या वाढदिवसापूर्वी काहीतरी सरप्राईज द्यायचे आहे. नंदिनी येथे तिच्या नातेवाईकाच्या घरी राहत होती.

26 वर्षीय पंडी माहेश्वरी मदुराई येथील शाळेत नंदिनीसोबत शिकत असल्याचे तपासात समोर आले आहे. माहेश्वरीने तिचे नाव बदलून वेत्रीमारन केल्यानंतरही नंदिनीने मानवतावादी आधारावर त्यांची मैत्री सुरू ठेवली आणि ते दोघेही येथे एका कंपनीत काम करत असल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.