मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पद्धतीने आनंद व्यक्त करत साजरा करतात. म्हणून मद्यप्रेमींसाठीआनंदाची बातमी आहे. गृह विभागाने या आठवड्यात दोन दिवसांमध्ये मद्यविक्रीची वेळ वाढवून दिली आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार वाईन शॉप आणि बिअर शॉपमध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्यरात्री एक वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. यासोबतच परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत खुले असतील. पार्टी आणि क्लब यांची वेळ पहाटे पाचपर्यंत निर्धारित करण्यात आलेली आहे. शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या बनावट आणि बेकायदेशीर मद्यविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष असणार आहे.