“काळे मांजर आडवे जातेय”, शिंदे गटाचा राऊतांवर निशाणा

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज देशभरात राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष होत असताना राजकारण मात्र तापले असून शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

काळे मांजर .. 

आमदार संजय राऊत म्हणाले की, “अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिकमध्ये आरती करत आहेत. स्वतःला विधवान समजणारे रामावर प्रश्न विचारत आहे. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार आहे.”

तुमच्या पोटात का दुखतयं ?

तसेच यावेळी संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही आनंदोत्सव आहे. ‘आमची निवडणुकीची तयारी आहे तुमच्या पोटात का दुखतयं. यांनी मराठी माणसाची काहीच केलं नाही तरी मराठी माणसासाठी हे बोलतात,’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच “यांनी आधी घर सांभाळावे यांना घर सांभाळता आले नाही. राम नामाचा आम्ही निवडणुकीत घेऊ फायदा आणि त्याचा फायदा सुद्धा होईल, जो काम करतोय त्याने फायदा घेतल्यास गैर काय?” असा सवालही संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.