मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पाय आणखी खोलात जातांना दिसत आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊतांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. दरम्यान कालच संजय राऊतांच्या कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमवल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
संजय राऊतांनी वाधवान बंधूंसोबत संगनमत करून पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले, पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच आहेत. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.