संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मागची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज PMLA कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली.

खासदार संजय राऊत यांना ईडीने (ED) 31 जुलैला ताब्यात घेतले होते. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात (Patra Chawl Land Case) राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.