“आदित्य ठाकरे गोधडीत..”; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरु असून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत सरकार स्थापन केलं. बंडखोरी झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत  मोठ्या प्रमाणात शाब्दिक वाद होत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना विषय मिळत आहेत.

आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा

जळगावात एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. “आदित्य ठाकरे गोधडीत नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत” असं म्हणत गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) आदित्य ठाकरे (Adiyta Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.

हू इज आदित्य ठाकरे

‘हू इज आदित्य ठाकरे’, असं विचारत गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं आहे. आदित्य ठाकरे गोधडीत पण नव्हते तेव्हापासून आम्ही शिवसेनेत, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. आम्हाला गद्दार म्हणण्याचा आदित्य ठाकरेंना अधिकारच नसल्याचं पाटील म्हणाले. संजय राऊतांवरही (Sanjay Raut) यावेळी गुलाबराव पाटलांनी जोरदार टीका केली. संजय राऊत दुकान आवरा असं म्हणत चहापेक्षा किटली गरम अशी टीका राऊतांवर केली आहे.

३२ वर्षांचा पोरगा.. 

“३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत”

तेरा क्या होगा कालिया?

आदित्य ठाकरेंसह गुलाबराव पाटलांनी विरोधकांनाही ऐकवलं. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र, “आमचा गब्बर आहे”, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार

“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत ! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.